टीम इंडियात प्रचंड असंतोष ?, विराट, शास्त्रींचा ‘एककल्ली’ कारभार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीम इंडियामध्ये सध्या जोरदार धुसफुस सुरु असून कप्तान विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांच्या पसंतीचाच खेळाडु टीम इंडियामध्ये खेळू शकतो. विराट आणि शास्त्रींच्या एककल्ली कारभारामुळेच न्युझिलंडविरुद्ध भारताला पराभावाला सामोरे जावे लागले असल्याचे एका खेळाडुचे म्हणणे असल्याचा दावा केला जात आहे.

याबाबत एका वृत्तपत्राने वृत्त दिले असून त्यांच्या वार्ताहराला वर्ल्ड कप दरम्यान एका खेळाडुने ही माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. पण सध्या बीसीसीआयवर त्यांचे वर्चस्व असल्याने कोणताही सदस्य किंवा खेळाडु आपले भवितव्य लक्षात घेऊन त्यांना विरोध करु शकत नसल्याचा या खेळाडुने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

विराट व शास्त्री यांच्या एककल्ली कारभारामुळेच एकाच वेळी चार यष्टीरक्षकांना एकाचवेळी खेळविण्यात आले. त्यामुळेच न्युझिलंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. पण भितीमुळे कोणी विरोध करु शकत नाही. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांची कोहलीला सर्वाधिक पसंती आहे. बीसीसीआईचे तीन पदाधिकारी या सर्व परिस्थितीला विरोध करण्याऐवढी त्यांची शक्ती नाही. निवड समितीचे प्रमुख एम एस के प्रसाद हे कोणत्याही परिस्थितीत विराट, शास्त्रीला विरोध करु शकत नाही.
टीम इंडियात असेच खेळाडु खेळू शकतात जे रोहित आणि बुमराह सारखे आपला खेळ दाखवितील किंवा विराट आणि शास्त्री यांच्या पसंतीचा खेळाडु. विराट आणि रोहित याची टीम इंडियात दोन गट तयार झाले असल्याचे या खेळाडुचे म्हणणे आहे.

के राहुल, युजवेंद्रसिंह चहल यांचे वर्ल्ड कपमधील प्रदर्शन अत्यंत खराब झाले असतानाही त्यांना उपात्य फेरीत न्युझिलंडविरुद्ध खेळविण्यात आले. पण कुलदीप यादव याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. कारण चहल रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा खेळाडू आहे.

टीम इंडिया चौथ्या क्रमांकावरील खेळाडुच्या शोधात असताना अंबाती नायडु याने आपल्या खेळाने या जागेवर दावा सांगितला होता. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पहिल्या १० ओव्हरमध्ये जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती न्युझिलंड दौऱ्यात भारताची ४ बाद १८ अशी झाली होती. त्यावेळी चौथ्या नंबरवर आलेल्या अंबाती नायडु याने ११३ चेंडूत ९० धावा करुन भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतरही त्याला वर्ल्ड कपमधून वगळण्यात आले. त्यामुळे विराट, शास्त्रीच्या कारभारामुळे आपल्याला संधी मिळणार नाही, याची खात्री झाल्यावर त्याने शेवटी निवृत्ती जाहीर केली. पण या दोघांच्या विरोधात बोलायला कोणी पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’