128GB स्टोरेज आणि 6 कॅमेर्‍याचा Vivo चा ‘हा’ भन्नाट फोन झाला ‘स्वस्त’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : एका शानदार स्मार्ट फोन बाबत आज आपण जाणून घेणार आहोत. हा फोन खुपच जबरदस्त अशा फीचर्ससोबत येतो. आम्ही ज्या स्मार्टफोनबाबत बोलत आहोत त्याचे नाव आहे Vivo V17 Pro. जाणून घेवूयात याच्या फीचर्स बाबत…

Vivo V17 Pro मध्ये जबरदस्त असा 6.44 इंचाचा सुपर एमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. सोबतच तुम्हाला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 ऑक्टा-कोअर प्रोसेसर मिळतो. यामध्ये तुम्हाला 48+8+2+2 मेगापिक्सलचे चार रियर कॅमेरे मिळतात.

तसेच यामध्ये तुम्हाला 32+13 मेगापिक्सलचा ड्यूल सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 4,100mAh ची मोठी बॅटरी आहे. हा फोन केवळ 27,999 रूपयांमध्ये फ्लिपकार्टवरून तुम्ही खरेदी करू शकता.

You might also like