बुधवार पेठेत महिलेचा खून करुन पती फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती कारणावरुन पत्नीच्या गळ्यावर वार करुन तिचा खून करुन पती फरार झाल्याची घटना बुधवार पेठेतील जुना बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर बुधवारी सकाळी ७ वाजता घडली. मिना गब्बर काजी शेख (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर इनामुल्ला मलीक शेख (वय ३२) असे तिच्या पतीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मिना व शेख हे दोघेही पश्चिम बंगालमधील राहणारे आहेत. मिना ही गेल्या काही वर्षापासून वेश्या व्यवसाय करते. इनामुल्ला शेख हा काही काम धंदा करत नाही. गेल्या दीड महिन्यापासून बुधवार पेठेतील जुन्या बिल्डिंगमध्ये दोघे एका खोलीत हे पती-पत्नी म्हणून रहात होते. त्यांच्यात काही वेळा बाचाबाची झाली होती. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भांडणे झाली. तेव्हा रागाच्या भरात इनामल्ला शेख याने मिनाच्या गळ्यावर, पायावर चाकूने सपासप वार केले. मिना रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिचा आवाज ऐकून आजू बाजूच्या महिला गोळा झाल्या. तेव्हा शेख पळून गेला. तेथील मुलींनी मिनाला रुग्णालयात नेले. परंतु, त्यापूर्वीच तिचा मृत्यु झाला होता. फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like