World Cup 2019 : भारताच्या अडचणीत वाढ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आयपीयलचा ज्वर आता उतरला असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेटचा कुंभमेळा म्हणजेच विश्वकप स्पर्धेकडे लागले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ २२ मे रोजी लंडनला रवाना होणार आहे. मात्र भारतीय संघ ज्या विमानाने जाणार होता ती जेट एयरवेज कंपनीच बंद पडली, त्यामुळे आता भारतीय संघ जाणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० मे पासून या स्पर्धेला लंडनमध्ये सुरुवात होणार आहे.

भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ असे एकूण ३० जण यामध्ये आहेत. या सगळ्यांना बिजनेस क्लासचे तिकीट कोणती विमान कंपनी देऊ शकते याचा शोध घेतला जात असल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे. आणि त्यात बीसीसीआयने यश देखील मिळवल्याची माहिती मिळत आहे. भारतीय संघासाठी एमिरेट्स एअरवेजने ३० जागा उपलब्ध करून दिल्या असून, भारतीय संघ याच कंपनीच्या विमानाने लंडनला रवाना होणार असल्याचे समोर येत आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नसल्याचे समजते.

विश्वकपसाठी भारतीय संघ :

शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

Loading...
You might also like