कार्यशाळेत उपस्थित डॉक्टर्सना २ क्रेडिट पॉईंट  

लातूर : पोलीसनामा ऑनसाईन – जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना (डॉक्टर्स) क्षयरोग संदर्भात नवीन गाईड लाईननुसार पूरक माहिती मिळावी म्हणून आय. एम. ए. आणि जिल्हा क्षयरोग केंद्र, लातूरच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत उपस्थित डॉक्टर्सना २ क्रेडिट पॉईंट ही देण्यात आले.

ही कार्यशाळा उपसंचालक कार्यालय, लातूर येथे संपन्न झाली. या कार्यशाळेच्या निमित्ताने उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढगे, शा. वै. म. चे अधिष्ठाता डॉ. गोरे, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. रमेश भराटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. संजय सूर्यवंशी, डॉ. ओसवाल, डॉ. मुंदडा, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव तसेच या कार्यशाळेसाठी लातूरसह जिल्हाभरातून तब्बल १५७ वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी सांख्यिकी सहाय्यक ए. एफ. गाझी, प्रशांत मस्के व क्षयरोग विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.