धुळे तालुक्यातून युवा नेतृत्व उदयास…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या लोकसभेच्या निवडणूकीची धामधूम सुरु आहे. निवडणूका शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेच्या ४ थ्या टप्प्यातील मतदान दि. २९ एप्रिल रोजी पार पडेल. लोकसभेच्या या टप्प्यात धुळे लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे.

धुळे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे (ग्रामीण) विधानसभा क्षेत्रात भाजयुमो चे जिल्हाअध्यक्ष युवा नेते राम भदाणे पाटील यांच्या नेतृत्वात विविध प्रकारच्या रॅली, कॉर्नरसभा यांचे आयोजन करण्यात येत होते. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत होता.

लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून धुळे तालुक्यात राम भदाणे पाटील हे युवा नेतृत्व उदयास येत आहे. त्यांच्या नेतृत्वात धुळे (ग्रामीण) विधानसभा मतदार संघात डॉ. सुभाष भामरेंच्या प्रचारात आघाडी मिळाली तसेच त्यांनी सोशल मीडियाचा देखील या निवडणुकीत प्रचारासाठी प्रभावी वापर केला.

राम भदाणे पाटील हे धुळे ग्रामीण मतदारसंगाचे माझी आमदार दत्ताञय वामन पाटील उर्फ द.वा.पाटील यांचे नातू आहेत.
त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बरीच गणितं बदलतात का? हे पाहन उत्सुकतेचं ठरेल.