‘ईश्वरी’ चिठ्ठीनं परंपरागत युतीचा केला पराभव, हवेलीच्या उपसभापतीपदी युगंधर काळभोर

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असूनही उमेदवारच नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या फुलाबाई अशोक कदम यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्याने रोमांचकारी झाली.

उपसभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेनेने आपली पारंपारिक युती पाळली व महाआघाडीला दूर ठेवले त्यामुळे त्यांचा उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना समान मते मिळाली, उपसभापतीपदाच्या निवडीसाठी प्रशासनाला अखेर ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय निवडावा लागला. यात ईश्वरी चिट्ठीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याने, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सनी उर्फ युगंधर मोहन काळभोर यांची निवड झाली.

हवेली पंचायत समितीत एकुण एकवीस सदस्य असुन, सध्या अकरा सदस्यासह पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. तर भारतीय जनता पक्षाचे सहा सदस्य असुन, शिवसेनेचे चार सदस्य आहेत. यंदाचे सभापतीपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असूनही अनुसूचित जातीची महिला सदस्य राष्ट्रवादीकडे नसल्याने, सभापतीपद भारतीय जनता पक्षाकडे जाणार हे महिनाभरापुर्वीच स्पष्ठ झाले होते.

यामुळे नांदेड गणातुन निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या फुलाबाई कदम यांची अपेक्षेप्रमाने सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत फारकत झाली असली तरीही हवेली पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रोखण्यासाठी दोन्ही पक्षानी युतीचा फॉर्मुला अमलात आणला.ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर यांनी उघडपणे पक्ष विरोधात भुमिका घेतल्याने, सभापती पदाच्या निवडणुकीत नशीबाचा कौल मिळाला असला तरी, उपसभापतीपदाची निवडणुक मात्र नाट्यपूर्ण घडामोडींनी गाजली.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचाच उपसभापती व्हावा यासाठी तर दुसरीकडे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे तालुका नेतृत्वाने युतीचा उपसभापती व्हावा यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली.उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत उपसभापतीसाठी राष्ट्रवादीकडुन युगंधर काळभोर तर शिवसेनेच्या वतीने नारायण आव्हाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिल टिळेकर तर अनिरुध्द यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारीत वेळेत भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उपसभापतीपदाची निवडणुक घेण्यात आली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर यांनी उघडपणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. यामुळे युतीचे पारडे जड झाले असे वाटत असतानाच, ऐनवेळी भारतीय जनता पक्षाचे सदस्य अनिल टिळेकर मतदानाला गैरहजर राहिले. यामुळे सनी काळभोर व नारायण आव्हाळे या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीव्दारे निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.यात युगंधर काळभोर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर जोशी यांनी उपसभापतपदी काळभोर यांची निवड झाल्याची घोषित केले.

आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती फुलाबाई कदम यांचा सत्कार करण्यात आला. तर उपसभापती युगंधर काळभोर यांचा सत्कार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे व तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?