‘झील’च्या विध्यार्थ्यानी स्वराज्याच्या शिल्पकारांना दिली ‘मानवंदना’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – झील एजुकेशन सोसायटीचे विध्यार्थी दरवर्षी ‘प्रजासत्ताक’ दिनानिमित्त नवनवीन उपक्रम राबवत असतात. येत्या काळात ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करणारी झील एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक क्षेत्रात २५ वर्ष पूर्ण करणार आहे. या वर्षी स्वराज्याचे शिल्पकार राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालसुरे यांना २५ जानेवारी २०२० रोजी अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.

Jijau masaheb

या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने संभाजी काटकर (संस्थापक संचालक, झील एजुकेशन सोसायटी), जयेश काटकर (सचिव, झील एजुकेशन सोसायटी ),  प्रदीप खांदवे (कार्यकारी संचालक, झील एजुकेशन सोसायटी) , पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (पुणे), ब्रिगेडियर (निवृत्त) दीपक भट यांच्या हस्ते झाली.

भारत देशाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे याच इतिहासाला साक्षीदार मानून ३५० वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणाऱ्या राजमाता जिजाऊं, हे स्वप्न सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराजांचं स्वराज टिकवण्यासाठी आपले स्वतः चे बलिदान देऊन सिंहगड (कोंढाणा) गड पुन्हा स्वराज्यात आणणारे नरवीर तानाजी मालुसरे या तीन स्वराज्याच्या शीलेदारांची व भारत देशात सन्मानाने फडकवला जाणाऱ्या तिरंग्याची प्रतिकृती या वर्षी झील एज्युकेशन सोसायटीच्या ४००० पेक्षा जास्त विध्यार्थ्यानी साकारत मानवंदना दिली.

tricolour

या उपक्रमाची दखल घेत आंतराष्ट्रीय संस्था “वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्डस्, लंडन” या मध्ये नोंद करण्यात आली आहे व तसे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. आजच्या पिढीला स्वराजाचे मोल कळण्यासाठी तसेच त्याग व बलिदान करून घडवलेल्या स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी झील च्या विध्यार्थ्यानी अभिनव पद्धतीने गणतंत्र दिवसाचे औचित्य साधून या तिन्ही स्वराज्याच्या शिल्पकारांना मानवंदना दिली.

राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तरुणांचे स्थान महत्वाचे आहे आपले हक्क व कर्तव्याची जाणीव असलेला तरुण देशासाठी तसेच समाजासाठी निश्चितच भरीव योगदान देऊ शकतो मात्र त्यासाठी त्याने आपल्या पराक्रमी इतिहासाची आठवण ठेवावी व त्याचा अवलंब करावा या सर्व गोष्टींसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार त्याला सदैव प्रेरक व मार्गदर्शक ठरतील असे मत पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांनी व्यक्त केले.

tanhaji malusare

ब्रिगेडियर दीपक भट यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या तरुणांना सजग राहून सामाजिक भान व देशप्रेम जपण्याचे आवाहन केले. याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धनीती व गनिमी कावा भारतीय लष्करासाठी सदैव मार्गदर्शक आहेत हे मत मांडले.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

You might also like