… म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिली कांचन कुल यांना ‛झाशीच्या राणी’ची उपमा

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यामध्ये काल झालेली मुख्यमंत्र्यांची सभा ही विविध विषयांमुळे चर्चेत राहिली. त्यातीलच एक म्हणजे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला काटे की टक्कर दिलेल्या भाजपच्या उमेदवार कांचनताई कुल यांचा नामोल्लेख मुख्यमंत्र्यांनी ‛दौंडची झाशीची राणी’ असा केला आणि पुन्हा दौंडकरांना लोकसभेच्या आठवणी ताज्या करून दिल्या.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कांचन कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरश: घाम फोडला होता. दौंड तालुक्यामधून लोकसभेला सुद्धा कोणी राष्ट्रवादीला म्हणजेच पर्यायाने पवारांना आव्हान देऊ शकते हे त्यामुळे संपूर्ण राज्याला समजले होते. कांचन कुल यांचे माहेर हे खुद्द बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात असल्याने त्यांना संपूर्ण बारामती तालुक्याचा चांगला अभ्यास आहे त्यामुळे त्यांनी शहर आणि ग्रामीण अश्या या दोन भिन्न परिस्थितीवरील मर्मावरच बोट ठेवल्याने त्याचे उत्तर देताना बारामतीकरांची अक्षरश: दमछाक होताना दिसत होती.

पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीवेळी तुम्ही किती मतांनी निवडून येऊ शकता असा ज्यावेळी प्रश्न विचारला होता त्यावेळी मला निवडून येणे महत्वाचे वाटते मताधिक्यावर मी काही बोलणार नाही असे उत्तर देऊन ती लोकसभेची निवडणूक म्हणजे किती काटे की टक्कर होती हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले होते. कांचन कुल यांना त्यावेळी जर नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले इंदापुरचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ मिळाली असती तर आज परिस्थिती निश्चित वेगळी पहायला मिळाली असती असे विश्लेषण आजही राजकीय जाणकार करत आहेत.

कांचन कुल यांनी दिलेली काटे की टक्करचा नेमका हाच धागा पकडून काल मुख्यमंत्र्यांनी कांचन कुल यांना दौंडची झाशीची राणी ही पदवी दिली आणि यापुढे तर दौंडकरांचे बारामतीकरांना खूप तगडे आव्हान असणार आहे असा इशाराच जणू त्यांनी आपल्या या चार ओळींमधून देऊन टाकला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like