‘शिर्डीतून राधाकृष्ण विखे यांना उमेदवारी द्या’, राहाता भाजपचे निरीक्षकांकडे ठरावाचे पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी मतदारसंघाची उमेदवारी राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात यावी, असा ठराव राहाता तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. तसे पत्र आज पक्ष निरीक्षक आ. रामदास आंबेडकर यांना देण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज शहरामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी राहाता तालुक्याच्या वतीने हे निवेदन तालुका अध्यक्ष नंदकुमार जिल्हा चिटणीस संजय सोमवंशी, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन तांबे, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे पाटील यांनी दिले आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून विजय होतील, असा विश्‍वास यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी निरीक्षकांना दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –