‘लायन्स क्लब’च्या अध्यक्षपदी आनंद बोरा, सचिवपदी सुमित लोढा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी आनंद बोरा, सचिवपदी सुमित लोढा, खजिनदारपदी सतीश बजाज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. क्लबचे 210 देशामध्ये 15 लाख सभासदांच्या माध्यामातून सामाजिक कार्य चालू आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने शहरात नेत्रदान, रक्तदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आनण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

नुकतेच महाबळेश्‍वर येथे लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चे वार्षिक अधिवेशन झाले. तर नगर व पुणे येथे विभागीय परिषद झाली. दरवर्षा प्रमाणे जूनमध्ये नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात येत असून, ते क्लबच्या माध्यमातून सामाजिक उद्दीष्ट समोर ठेऊन वर्षभर कार्य करणार असल्याची माहिती नुतन अध्यक्ष आनंद बोरा यांनी दिली.

नवनिर्वाचित अध्यक्ष बोरा वैदयकिय औषधांचे वितरक म्हणून कार्यरत आहेत. केमिस्ट आणि ड्रग अससोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक कार्य केले असून, विविध उपक्रमात त्यांचा सहभाग नेहमीच असतो. लायन्स क्लबचे माजी सचिव तसेच केमिस्ट आणि ड्रग अससोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी यापुर्वी काम पाहिले आहे.

सचिव लोढा हे उद्योजक असून, अहमदनगर एम. आय. डी. सी येथे त्यांचा लघुद्योग सुरु आहे. आमी या ओद्योगिक संघटनेचेते खजिनदार आहेत. खजिनदार बजाज प्लायवूडचा व्यवसाय आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांचे सामाजिक कार्य चालू असते. तर लायन्सच्या सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग असतो. उपाध्यक्ष म्हणून अस्थिरोग तज्ञ डॉ. अमित बडवे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नुतन पदाधिकार्‍यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.