न्यूज अँकरच निघाला खूनी, पत्नीच्या ‘मर्डर’ चा रचला ‘कट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील इटावा येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका न्यूज अँकरने प्रेमिकेसोबत राहण्यासाठी आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. आपल्या मित्राच्या माध्यमातून आपल्या पत्नीची हत्या घडवून आणली. उत्तरप्रदेशातील इटावा येथे हि धक्कादायक घटना घडली असून नोयडा येथे अँकर असलेल्या अजितेश मिश्रा याने आपल्या मित्राला पाठवून हि हत्या घडवून आणली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितेश मिश्रा याने आपला मित्र अखिल आणि प्रेमिका भावना आर्या यांच्यासह मिळून हत्येचा कट रचला होता. अजितेश याने नोयडामध्ये बसून आपला मित्र अखिल याच्याकडून त्याने हा खून करून घेतला. हत्या करण्यासाठी अखिल हा त्याच्या इटावामधील घरी गेला असता त्याची पत्नी दिव्या हिने दरवाजा उघडला. ती त्याला आधीपासून ओळखत असल्याने तिने दरवाजा उघडला. त्यावेळी घरात शिरल्यावर त्याने गप्पा मारत असताना तिच्या डोक्यात फुलदाणीचा जोरात वार केला. त्यानंतर तो बेशुद्ध झाल्यानंतर आणखी वार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो सरळ नोयडाला निघून गेला. त्यानंतर या हत्येचा तपास करत असताना पोलिसांना या तिघांची माहिती मिळाल्यानंतर अजितेश मिश्रा, अखिल सिंह आणि भावना या तिघांनाही अटक केली आहे.

दरम्यान, हत्येच्या दोन दिवस आधी अजितेश आणि दिव्या यांच्यात याच कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला आणि मित्राच्या मदतीने तिची हत्या केली. याचबरोबर पोलिसांनी या तिघांनाही हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी