अहमदनगरच्या कारागृहात बंदिवानाकडं सापडली नक्षल्यांशी संबंधित ‘बातमी’ आणि एक ‘चिठ्ठी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा कारागृहात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका बंदिवानाकडे नक्षल्यांशी संबंधीत बातमीचे कात्रण आणि एक चिठ्ठी सापडली आहे. यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बंदिवानाची संपूर्ण माहिती काढून नक्षलवाद विरोधी अभियानाकडे अहवाल पाठवला आहे. पावलस कचरू गायकवाड असे या बंदिवानाचे नाव आहे. गायकवाड याला सीआयसीएफमधून बडतर्फ करण्यात आले आहे.

गायकवाड याला पत्नीच्या नातेवाईकांवर खुनी हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पारनेर पोलिसांनी अटक केली होती. त्याला जामीन न मिळाल्याने मागील काही महिन्यांपासून तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलवर चाकूने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गेटची चावी न मिळाल्याने त्याचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. हा प्रकार इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.

कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे नक्षलवादी हे तरुणांना भरती करुन कसे प्रशिक्षण देतात अशा आशयाच्या एका वृत्तपत्राची बातमी आढळून आली. तसेच त्याच्या आई आणि मुलीच्या नावे लिहलेली एक चिठ्ठीही सापडली. त्या चिठ्ठीमध्ये मला तुमची खूप आठवण येत आहे. पण आता माझी वाट पाहू नका. मी माझा मार्ग निवडला आहे असा मजकूर लिहला होता. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्याची माहिती घेत यासंदर्भात नक्षलवाद विरोधी अभियानाकडे याचा अहवाल पाठवला आहे.

कोण आहे हा पावलस गायकवाड ?
पावलस गायकवाड हा पाथर्डी येथील रहिवासी आहे. तो सीआयएसएफमध्ये कार्यरत होता. डिसेंबर 2014 मध्ये त्याने त्याच्या पत्नीच्या माहेरच्या नातेवाईकांवर हल्ला केला होता. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. जामीन न मिळाल्याने तो न्यायालयीन कोठडीत असून त्याला सीआयसीएफमधून बडतर्फ करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?