‘या’ जिल्ह्यातील सर्व हाॅटेल, लाॅजची रोज होणार ‘झाडाझडती’ ; पोलीस आयुक्तांचा आदेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तरुण-तरुणी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आगळा-वेगळा फंडा आखला आहे. तरुण-तरुणी, जोडपी अश्लील कृत्यांसाठी हॉटेल, लॉजचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल, लॉजची रोज झाडाझडती घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.

बेकायदेशीर कृत्य आढळल्यास हॉटेलसह व्यवस्थापक व जोडप्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात हॉटेल, लॉजचा बहुतांश वापर गैरकृत्यांसाठी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हॉटेल, लॉजवर अश्लील कृत्ये करणाऱ्या जोडप्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांना दिल्या आहेत. हॉटेलवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर असे प्रकार घडणार नाहीत. काही ठिकाणी वेश्या व्यवसायाच्या तक्रारी आहेत.
हॉटेल, लॉजसह, बंगले, फ्लॅटचा त्यासाठी वापर होत आहे. अशांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

तपासाच्या नावाखाली हप्ते वसुली –

पोलिसांच्या या कृत्याचा मोठा परिणाम आमच्या व्यवसायावर होणार असून सुरुवातीला तपासणी केली जाते. काही दिवसानंतर तपासणीच्या नावाखाली हप्ते वसुली सुरु होते. त्याचा नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांना त्रास दिला जातो, अशी तक्रार लॉज व्यावसायिकांकडून केली जात आहे.