बिबवेवाडी पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांचे रिक्षासंघटना व रिक्षाचालकांना मार्गदर्शन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षाचालकांनी प्रवाशांना सेवा देताना पोलिसांचे मित्र म्हणून काम करावे, शहरभर भटकंती करत असताना कुठे संशयित व्यक्ती किंवा इतर हालचाली दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी रिक्षाचालक-मालकांनी जागल्याची भूमिका बजावावी. तसेच रिक्षाचालक व्यवसायानिमित्त शहरातील कानाकोपऱ्यात जात असतो प्रत्येक विभागात होणाऱ्या हालचाली टिपत असतो त्याच्या या माहितीचा वापर पोलिसांना होऊ शकतो चालकांनी सर्वत्र फिरताना कुठे संशयित व्यक्ती आढळली तर त्याविषयी माहिती पोलिसांना द्यावी.

सर्रास सुरू असणाऱ्या चुकीच्या घडामोडीची माहिती दिली तर त्याचा फायदा तपास करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे रिक्षाचालकांनी यापुढे आधिक दक्ष राहून पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून पोलिसांना गुन्हेगार शोधण्यामध्ये महत्त्वाची मदत होऊ शकेल. रिक्षाचालक, प्रवासी व पोलीस यांच्यामध्ये चांगले संबंध प्रस्तापित व्हावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. रिक्षाविषयी प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, कोणती कार्यवाही होणे आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भाडे नाकारणे, जादा प्रवासी घेवून जाणे थांबवावे, असे आवाहन बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे व सहकार नगर वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल नवगिरे यांनी केले.

सदर मार्गदर्शन कार्यक्रमात चैन स्नॅचिंग जनजागृती संदर्भात रिक्षांवर स्टिकर लावण्यात आले. तसेच प्रामाणिक रिक्षाचालक राहुल यादव यांनी प्रवासाचे 25,000 रुपये बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आणून दिल्याने व रिक्षाचालक जुबेर शेख यांनी एका सात वर्षीय मुलगी रोडवर रडत असल्याने तीची चौकशी करून तिला बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आणून तिच्या पालकांचा शोध घेऊन तिला सुखरूप त्यांच्या ताब्यात दिल्याने. त्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर मार्गदर्शन कार्यक्रम, बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे व सहकार नगर वाहतूक पोलीस निरिक्षक अतुल नवगिरे, पोलीस हवलदार तनपुरे, खंडाळे, पोलीस नाईक दुधाने, खामकर, पोलीस शिपाई पवार, देवकाते तसेच शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक सांळेकर, आबा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like