सेल्फी काढणार्‍या चाहत्यासोबत ‘भाईजान’नं केलं असं काही, फॅन्सनं केला राग व्यक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सलमान खान बॉलिवूडचा एक मोठा स्टार असून त्याची फॅन फॉलोव्हिंगही जबरदस्त आहे. तो जिथे जिथे जाईल तिथे चाहते त्याला घेरतात. नुकतेच त्याला गोवा विमानतळावर स्पॉट केले गेले यावेळी असे काही घडले जे पाहून चाहत्यांना विश्वास बसणार नाही.

सलमान आपल्या आगामी ‘राधेः इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्यात गेला होता. विमानतळावर लोकांनी सलमानला पाहिले आणि त्याच्याकडे धावले. दरम्यान, एका चाहत्याने सलमानसोबत सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न केला पण सलमान पटकन पुढे गेला आणि त्याचा फोन हिसकावून घेऊन निघून गेला.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सलमान त्याच्या परवानगीशिवाय सेल्फी फोटो काढणाऱ्या व्यक्तीचा फोन उडी मारुन हिसकाऊन घेताना दिसत आहे.

सलमानचा असा नियम आहे की तो परवानगीशिवाय कोणालाही फोटो काढू देत नाही. हेच कारण आहे की जेव्हा एखाद्याने असे कृत्य केले तेव्हा त्याने त्याचा फोन हिसकावून घेतला.

पण सलमानचा हा अ‍ॅटिट्यूड लोकांना आवडली नाही त्यामुळे सलमानवर खूप टीका करण्यात आली आहे. असे काही लोक आहे जे सलमानची बाजू घेऊन म्हणत आहे की, परवानगीशिवाय फोटो काढणे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करण्यासारखे आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर ‘राधे’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जॅकी श्रॉफ, गौतम गुलाटी आणि दिशा पाटनी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सलमान पुढच्या वर्षी ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like