भारतानंतर आता ’या’ देशातही TikTok वर बंदी !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारतामध्ये 59 अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अ‍ॅपचा देखील समावेश आहे. दरम्यान आता हाँगकाँगमध्ये देखील टिकटॉक ऑपरेशन बंद होणार आहे.


भारतामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बॅन करण्यात आलेल्या टिकटॉकने हाँगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीन सरकारच्या नव्याने लागू केलेल्या कायद्यानंतर ऑपरेशन्स थांबविणे आणि हाँगकाँगमधून बाहेर पडण्याचा निर्णय या टिकटॉक या चिनी अ‍ॅपने घेतला आहे. या कायद्यानुसार कंपन्यांना युजर डेटा देणे आणि देशात व्यवसाय करण्यासाठी सेन्सॉरशीप विनंत्यांचे पालन करणे आवश्यक आहे.