‘या’ अभिनेत्रीने बिग बॉसची ऑफर नाकारली, ‘हे’ होते कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री तेजस्विनी प्रकाशने बिग बॉस 13 ची ऑफर नाकारली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, तेजस्विनी प्रकाशला बिग बॉसने अप्रोच केले होते पण अभिनेत्रीने सलमान खानच्या शोचा भाग होण्यास नकार दिला. याची पुष्टी खुद्द तेजस्विनी प्रकाश हीने केली आहे. तेजस्विनीला बिग बॉस 13 मध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्साही झाले होते. पण आता चाहत्यांना रियलिटी शोमध्ये अभिनेत्री तेजस्विनीला पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

पिंकविला शी बोलताना तेजस्विनी प्रकाश म्हणाली, “बिग बॉस 13 साठी मला अप्रोच केले गेले होते पण मी नुकताच एक रियलिटी शो पूर्ण केला आहे, त्यामुळे मला ब्रेक हवा आहे. कदाचित चाहते मला दुसर्‍या सीजनला बिग बॉसमध्ये पाहतील.
तेजस्विनी प्रकाशने ‘खतरों के खिलाडी 10’ मध्ये भाग घेतला होता. तिला शोमधून काढून टाकण्यात आले होते. तेजस्विनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवू शकली नाही. तेजस्विनी बर्‍याच टीव्ही शोमध्ये दिसली आहे. कलर्सवरील शो ‘संस्कार: धरोहर आपना की’ मधून मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली होती. यानंतर ती स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया अशा शोमध्ये दिसली आहे. बिग बॉस -13 शो 29 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

You might also like