अभिनेत्री ईशा गुप्‍ताला त्यानं केलं रात्रभर ‘परेशान’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ताने नुकताच एक खुलासा केला आहे. ईशाने या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ईशाने एका व्यक्तीवर तिच्यावर रात्रभर नजर ठेवल्याचा आरोप लावला आहे. तो व्यक्ती एक हॉलेटचा मालक आहे. ईशाने सांगितले की, तो व्यक्ती तिच्यासमोर बसला होता आणि तिच्याकडे पाहत होता. तो व्यक्ती ईशाचा चाहता होता म्हणून तो तिला पाहत होता. यावर ईशाने एक प्रश्न उपस्थित केला की, पुरुषांना मुलींना एकटक पाहण्याची सुट दिलेली असते का ? एखाद्या महिलेला एकटक पाहणे हे बरोबर आहे का ? आम्ही सुरक्षित आहोत का ? आम्ही महिला आहोत हे शाप आहे का ?

ईशाने पुढे लिहले की, ‘जर माझ्यासारख्या महिलेला सिक्यूरिटी असून देखील देशात असुरक्षित वाटत असेल तर बाकीच्या मुली काय विचार करत असेल. या घटनेने असे सिद्ध केले की, अजूनही महिलेच्या सुरक्षितेची चिंता देशात आहे. ‘ ईशाच्या या ट्विटनंतर सोशल मिडियावर काही यूजर्सने याला पब्लिसिटी स्टंट म्हणले आहे कारण मागच्या शुक्रवारी ईशाचा चित्रपट ‘वन डे : जस्टिस डिलिवर्ड’ प्रदर्शित झाला आहे.

सुप्रीम कोर्टमध्ये सीनिअर वकील विराग गुप्ता यांनी सांगितले की, ‘निर्भया कांड नंतर महिलांचे कायदे खूप कडक केले आहे. महिलांना घुरने किंवा त्यांचा पाठलाग करणे हे देखील अपराध होण्याच्या लिस्टमध्ये आहे. यासाठी ३ वर्षाची शिक्षा आहे. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की, अपराधींना हे करण्यापासून रोखण्यासाठी हा कायदा काढला आहे. केरळमध्ये लागू झालेल्या कायद्यामध्ये असे आहे की, मुलांनी मुलींकडे १४ सेकेंदपेक्षा जास्त वेळ पाहिल्याने हा गुन्हा ठरला जातो. हा कायदा केरळमध्ये २०१६ मध्ये लागू झाला.

इशाच्या बाबतीत चित्रपट निर्माते गिरीश जौहर म्हणतात की, मला असे वाटत नाही की कुणीही अशा नैतिकतेकडे लक्ष देईल आणि चित्रपटासाठी अशी गोष्ट बोलेल. ईशा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. असे वाटत नाही की, ईशाच्या या घटनेचे आणि चित्रपटाचे काही कनेक्शन असेल. चित्रपट प्रमोशन दरम्यान कलाकारांना हॉटेलमध्ये थांबावे लागते. तेव्हा असे घडते. तेव्हाच छेडछाडीची घटना घडते.

सार्वजनिक ठिकाणी मुलींना पाहणाऱ्या व्यक्तींच्या सायकोलॉजीबद्दल सीनिअर मनोचिकित्सक विपुल रस्तोगी म्हणतात की, एकटक पाहणाऱ्या व्यक्तीला वाटते की, त्याने कोणता गुन्हा केला नाही. काहीवेळा मुली या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात. कारण जो व्यक्ती मुलीला एकटक पाहत असतो तो मुलगा मुलीला काही बोलत नाही आणि त्याने तिला स्पर्शही केलेला नसतो त्यामुळे मुलीला त्या मुलाशी वाद घालण्यासारखे कारण नसते. ईशा गुप्ता सेलिब्रिटी आहे त्यामुळे ती बोलली पण बाकीच्या मुली बोलू शकत नाही.

डॉ. रस्तोगी म्हणातात की, काही लोकांना मुलींना त्रास देण्याची सवय असते. एंटी सोशल मानसिकतेचे लोक मुलीचा गैरफायदा घेतात.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like