‘शाहरुख खान घेणार सिनेमातून ब्रेक’, अनुपम खेर यांचा ‘खुलासा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अनुपम खेर यांचा वन डे जस्टीस डिलीवर्ड हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. या सिनेमात त्यांच्यासोबत ईशा गुप्ता आणि कुमुद मिश्रा प्रमुख भूमिकेत दिसले होते. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अनुपम खेर यांनी सांगितले होते की, यावेळी त्यांच्याकडे कोणताही सिनेमा नाही. साधारणपणे अनुपम खेर एक सिनेमा झाल्यानंतर आपल्या पुढच्या सिनेमावर 3-4 महिन्यातच काम सुरु करतात.

यावेळी अनुपम खेर यांनी निर्णय घेतला आहे की, ते त्यांच्या करिअरच्या पुढील फेजमध्ये जाण्यासाठी सिनेमातून ब्रेक घेणार आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी शाहरुख खान सोबत झालेल्या संवादाबाबत सांगितले. त्यांनी सांगितले की, तसं तर शाहरुखशी जास्त बोलणं होत नाही. परंतु सोशलवर आम्ही बोलत असतो.

नुकताच शाहरुखनेही सिनेमातून काही दिवसांपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनुपम खेर यांनी शाहरुखच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “हा एक चांगला निर्णय आहे. कधी कधी असे निर्णय तुम्हाला स्वत:ला समजण्यासाठी मदत करतात.”

एप्रिलमध्ये शाहरुखने घोषणा केली होती की, त्याला आता काही काळ आपले कुटुंब आणि मुलांसोबत घालवायचा आहे. शाहरुख शेवटचा आनंद एल राय यांच्या झिरो या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत कॅटरीना कैफ दिसली होती. अनुष्का शर्माही प्रमुख भूमिकेत होती. हा सिनेमा विशेष चालला नाही.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांनी गरोदरपणात व्यायाम केल्याने होतील ‘हे’ खास फायदे

पावसाळ्यात फिट राहण्यासाठी ‘हा’ आहार घ्या, जाणून घ्या

दोरीवरील उडया मारण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

डायबिटीज नियंत्रित करायचा आहे ? मग नक्की करा हे घरगुती उपाय

निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यातील आयुर्वेदिक उपाय,जाणून घ्या

मुडदूस होण्याची ‘ही’ आहेत लक्षणं, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like