Video : १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार्‍या ‘बाटला हाउस’चा टीजर ‘OUT’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमचा अपकमिंग चित्रपट ‘बाटला हाउस’ चा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीजरमध्ये २००८ मध्ये दिल्लीमध्ये झालेला ‘बाटला हाऊस’ मुठभेडवर आधारित चित्रपटाच्या कथेची दमदार झलक पहायला मिळत आहे.

टीजरची सुरुवात वॉईस रेकॉर्डिंगपासून होते. यानंतर गोळीबार होताना दिसत आहे. या चकमकीमध्ये जॉनची झलक पहायला मिळते. यानंतर कोणाचा तरी ओरडलेला आवाज ऐकू येतो. त्यानंतर, जॉन अब्राहमच्या आवाजातल्या प्रश्न ऐकायला मिळतात. जसे की, उस दिन क्या हुआ बाटला हाउस में? क्या हम गलत थे? क्या मैं गलत था? असे डायलॉग ऐकताना स्क्रिनवर लिहलेले दिसते की, २००८ मध्ये गन शॉट्समुळे अनेक कथा बनल्या. ११ वर्षानंतर आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत खरी कथा.

या टिजरला सोशल मिडियावर शेअर करुन जॉनने लिहले की, ‘त्यावेळी झालेल्या गोळीबारांचा आवाज ११ वर्षानंतरही घुमत आहे. याची खरी कथा पहा बाटला हाउसमध्ये.’ चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारीमध्ये पुर्ण झाली होती. या सिनेमात जॉनच्या भूमिकेचे नाव संजीव कुमार यादव आहे, ज्यांचा बाटला हाऊस एनकाऊंटरमध्ये महत्त्वाचा रोल होता. हा सिनेमा एक थ्रिलर ड्रामा असणार आहे. रितेश शाह यांनी हा सिनेमा लिहिला आहे. निखिल आडवाणी हा सिनेमा डायरेक्ट करत आहेत. याचा ट्रेलर १० जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या ‘अगस्ता वनस्पती’चे औषधी फायदे

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक चहांचे सेवन करा

‘हार्ट अ‍ॅटॅक’ पासून दूर राहण्यासाठी आहारातील ‘हे’ पदार्थ कटाक्षाने टाळा

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

 

Loading...
You might also like