Sridevi ला अजिबात आवडत नव्हती खुशी कपूरची ‘ही’ गोष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा आपल्या दोन्ही मुली खुशी कपूर आणि जान्हवी कपूर दोघींवरही भरभरून प्रेम होतं. श्रीदेवी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करायची. इतकेच नाही तर वेळ पडल्यास त्यांना रागवतही असत. अशातच आता खुशीने एका गोष्टीचा खुलासा केला आहे. श्रीदेवीला आणि आपल्या मोठ्या बहिणीला तिची कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही.

एका मुलाखतीत जान्हवी आणि खुशी दोघीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना खुशी म्हणाली की, “मी माझ्या शरीरावर तीन टॅटू काढले आहेत. एकामध्ये तिने कुटुंबियांची जन्मतारीख रोमन नंबर्समध्ये काढली आहे दुसऱ्यामध्ये तिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव आहे.

खुशी म्हणाली की, “तिसरा टॅटू माझ्या हिपवर आहे. त्यात लिहिलं आहे की, “आपला रस्ता आपण स्वत: तयार करावा” (अपनी राह खुद बनाओ) परंतु या टॅटूसाठी मी नाराज आहे. कारण हा टॅटू श्रीदेवी यांना अजिबात आवडत नव्हता. इतकेच नाही तर जान्हवीलादेखील हा टॅटू आवडत नाही.” असे खुशी म्हणाली.

View this post on Instagram

👯‍♀️ #voguebffs

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवी याबाबत बोलताना सांगते की, टॅटू सारख्या गोष्टी करण्यासाठी खुशी सध्या खूप लहान आहे. जान्हवी म्हणते की, “लग्नानंतर मी माझ्या नवऱ्याला टॅटू बनवायला सांगणार आहे. ज्यात लिहिलेलं असेल, “प्रॉपर्टी ऑफ जेके”

 

Loading...
You might also like