सारा अली खान, अनन्या पांडे नंतर ‘ही’ अभिनेत्री कार्तिक आर्यनवर ‘फिदा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चांगलाच लाईमलाईटमध्ये आहे असे दिसत आहे. याला कारण म्हणजे त्याचा कोणता सिनेमा नाही तर त्याची पर्सनल लाईफ आहे. जरी कार्तिक आर्यन कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नाहीये तरी त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांमुळे तो चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि अनन्या पांडेने कार्तिकवर क्रश आहे असे म्हटले होते. आता संजय लीला भंसाळींची भाची शर्मिन सहगलचाही कार्तिक आर्यनवर जीव जडला आहे.

शर्मिनला जास्तीत जास्त वेळ कार्तिक आर्यनसोबत घालवायचा आहे. तिला वाटतं की, तिने कार्तिकला जवळून ओळखावं मलाल सिनेमातून नुकताच तिने बॉलिवूड डेब्यू केला आहे. शर्मिनला नुकतंच विचारण्यात आलं की, जर कार्तिक आर्यनला काही विचारायचे असेल तर काय विचारशील ? यावर उत्तर देताना शर्मिन म्हणाली की, “मी विचारेल की, कार्तिक तू माझ्यासोबत डेटवर येशील का ?” जेव्हा शर्मिनला यामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली की, “मला कार्तिकसोबत डेटवर जायचं आहे कारण मला त्याच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मला त्याच्यासोबत बोलायला मिळावं आणि त्याला नीट ओळखता यावं अशी माझी इच्छा आहे.”

शर्मिनचे उत्तर ऐकून नक्कीच वाटतं की, तिचा कार्तिक आर्यनवर जीव जडला आहे. परंतु कार्तिक यावर काय रिअॅक्शन देतो हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्यो तो आगामी सिनेमा लव आज कल 2 आणि पती पत्नी और वो मध्ये बिजी आहे. लव आज कल 2 मध्ये कार्तिक सारासोबत दिसणार आहे. तर पती पत्नी और वो मध्ये कार्तिक अनन्या पांडे सोबत दिसणार आहे.

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा