Video : प्रभु देवाच्या ‘उर्वशी उर्वशी’ या गाण्यावर थिरकला ‘भाईजान’ सलमान खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट ‘दबंग 3’ वर काम करत आहे. या चित्रपटाला प्रभू देवा बनवत आहे. हा चित्रपट यावर्षीचा मोस्ट अवेटेड चित्रपटामधून एक आहे. सलमानचा सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान प्रभू देवाकडून डान्स शिकताना दिसत आहे.

‘दबंग 3’ मध्ये साउथ इंडियन स्टार सुदीप विलनच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्याचबरोबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रज्जो आणि अरजाब खान मक्खनचंद पांडे अशा जुन्या भूमिकाच साकारताना दिसणार आहे. सलमान खान नेहमी सोशल मिडियाच्या अकाउंटवर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याचबरोबर चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देखील असेच आहे.

सलमानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सलमान खान व्यतिरिक्त सुदीप आणि प्रोड्यूसर साजिद नाडियडवाला हे प्रभू देवाकडून डान्स शिकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सगळे उर्वशीच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याचबरोबर सगळे गमतीदार एक्सप्रेशन देताना दिसत आहे. या व्हिडिओला सलमानने शेअर करुन कॅप्शन लिहले की, ‘डान्स मास्टर प्रभू देवा डान्स क्लास घेत आहे.’

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?