नागपूर महापालिका अधिकारी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह ! शहरात खळबळ, नव्या विषाणुचे 5 संशयित रुग्ण

नागपूर : नागपूर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी दुसर्‍यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. क़ोरोनाची लक्षण आढळल्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, नागपमरमध्ये नव्या कोरोना स्ट्रेनच्या संशयित रुग्ण संख्येत वाढ झाली असून ही संख्या ५ वर पोहचली आहे. नागपूरमध्ये आयर्लंडमधून आलेल्या ३६ वर्षाची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. हा संशयित रुग्ण २५ नोव्हेंबरला आयर्लंड येथून दिल्लीत आला होता़ त्यानंतर तो रायपूरमध्ये एका विवाह समारंभात सहभागी झाला होता. विवाह सोहळा आटोपल्यानंतर ही व्यक्ती १४ डिसेंबर रोजी नागपूरात दाखल झाली होती. त्यानंतर त्यांच्यात अचानक कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर २६ डिसेंबरला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला होता. या संशयित रुग्णाचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

गोव्यात तब्बल ३५ परदेशी नागरिक पॉझिटिव्ह
गोव्यात ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी ३५ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनवरुन ९७९ प्रवासी भारतात आले होते. त्यातील ४६५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या सर्व ३५ रुग्णांना आरोग्य प्रशासनाने स्पेशल कोविड रुग्णालयात ठेवले आहेत.