रात्री उशिरा रेस्टॉरंटच्या बाहेर ‘स्पॉट’ झाली कॅटरिना, मेकअप शिवाय दिसला अभिनेत्रीचा ‘असा’ लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘भारत’ चित्रपटातील अभिनेत्री कॅटरिना कैफ बर्‍याचदा आपल्या लुकमुळे चर्चेत असते. अभिनेत्री कॅटरिना नेहमीच आपल्या लूकने चाहत्यांची मने जिंकत असते. सोशल मीडियावर तिची स्टाईल चाहत्यांना चांगलीच पसंत पडत असते. नुकतेच या अभिनेत्रीला मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट केले गेले, हीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/B8OPCQUHVCy/

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कॅटरिना व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने पांढर्‍या कलरचे शूज परिधान केले आहे. विना मेकअप आणि ओपन हेअरमध्ये अभिनेत्री कॅटरिना खूपच साधी दिसत आहे, पण अशा साध्या लूकमध्ये देखील अभिनेत्री सुंदर दिसत आहे. लूक कॅरी करताना कॅटचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे.

https://www.instagram.com/p/B8OMfp1h7CV/

तिच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर, सध्या अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात कॅटरिना अभिनेता अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे 27 मार्च रोजी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री कॅटरिना कॅफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे सेक्सी फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो चाहत्यांना आवडतात. कॅटरिना प्रत्येक फोटोमध्ये स्टाइलिश अंदाजात पोज देताना दिसते. तिचे इन्स्टाग्राम अकाउंटवर 32 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला लाखापेक्षा जास्त लाइक्स असतात.