‘हॉलिवूड स्टार’ किम कार्दशियननं स्किनटाईट आउटफिटमध्ये दाखवली ‘कव्ही’ फिगर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फेमस हॉलिवूड स्टार किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. तिची किल्लर फिगर पाहून चाहते तर घायाळ होतातच याशिवाय मुलीही फॅशनच्या बाबतीत तिल फॉलो करत असतात सोशलवरील तिच्या फॉलोवर्सना तर काही तोडच नाही. बुधवारी किम आणि तिची बहिण लास एंजेलिसमध्ये स्पॉट झाली. यावेळी तिचा लुकही पाहण्यासारखा होता.

सध्या किमचे लॉस एंजेलिसमधील काही फोटो समोर आले आहेत जे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. किमच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्राऊन पँट आणि टाईट शायनी टॉप घातला होता. 39 वर्षीय किम या लुकमध्ये खूपच अ‍ॅक्ट्रॅक्टीव दिसत होती. तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. किमची कर्वी फिगर यावेळी खूपच हायलाईट होताना दिसली. चाहत्यांनी तर किमच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

किमनं आपला लुक पूर्ण करण्यासाठी लाईट मेकअप आणि सिम्पल हेअर स्टाईलही केली होती. या लुकमधील किमला पाहून अनकेजण तिला पहातच उभे होते. किम सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला तिला खूप आवडतं. किम अनेकदा फॅमिलीसोबत आऊटींगला जाताना दिसत असते.