मुलीला ‘चापट’ मारणार होता युजवेंद्र चहल, तिनं प्रेमानं खेचले ‘गाल’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल अशा खेळाडूंमध्ये मोडतो जे आपल्या शैलीने जिथे असतील तिथे सर्वांना आनंदी ठेवतात. सोशल मीडियावर तो खूप अ‍ॅक्टिव्ह राहतो आणि प्रत्येक वेळी तो नव्या चाहत्यांसोबत काहीतरी शेअर करत असतो. कधी त्याचे टॅटू तर कधी त्याचा डान्स तर कधी चहल टीव्हीमुळे नेहमी चर्चेत राहतो. नुकताच सोशल मीडियावर चहलचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी त्याचे गाल खेचताना दिसत आहे.

गायक रमित संधू सोबत दिसला चहल

व्हिडिओमध्ये तो ब्रिटिश मॉडेल आणि गायक रमित संधूसोबत चालताना दिसत आहे. तेवढ्यात तो अचानक गुडघे टेकून बसतो आणि आपल्या बुटाची लेस बांधतो. त्याच वेळी मुलगी त्याच्या मागून येते आणि त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते पण चहल रागावतो. मग मुलगी प्रेमाने त्याचे गाल खेचते. आतापर्यंत ४ मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडीओला आली आहेत. तसेच ४ लाखांहून अधिक लाईक्स आणि हजाराहून जास्त कमेंट्स आल्या आहेत.

सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे चहल

यापूर्वी चहलचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तो टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत नाचताना दिसला. व्हिडिओमध्ये हे चारही खेळाडू एकाच पद्धतीनं सारखेच नाचत होते. श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेही चहलसोबत नाचत होते. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की सर्वत्र चाहत्यांनी या नृत्याची कॉपी करण्यास सुरवात केली.

https://twitter.com/Man_isssh/status/1240328284375638016