IMD Warning : पुन्हा येणार ‘हूडहूडी’ भरवणारी थंडी, 12-13 जानेवारीला ‘या’ ठिकाणी होणार पाऊस, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा उत्तर भारतात सर्दीने लोकांना हैराण करून सोडले आहे. गुरुवारी देशातील अनेक भागांत पावसासह गारपीठ झाली. त्यामुळे तापमान कमी होऊन लोकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. एवढंच नाही तर भारतीय हवामान विभागाने लोकांना सतर्क केले आहे की येणाऱ्या २-३ दिवसात कडकडणारी थंडी पडू शकते. तसेच हवामान विभागाचे म्हणणे आहे की, डोंगराळ भागात १२ आणि १३ जानेवारी च्या दरम्यान जोरात पाऊस पडू शकतो ज्याने तापमान कमी होऊन थंडी वाढेल.

हवामान विभाग :
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पश्चिमी हिमालयीन प्रदेशात ११ जानेवारी ला पश्चिमी वारे सक्रिय होणार असून जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील काही विभागांमध्ये येणाऱ्या तीन दिवसांत जोराचा पाऊस होऊ शकतो. तसेच हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीनंतर भूस्खलन होण्याच्या घटना समोर येत आहेत, बजीर – बावर भूस्‍खनलनामुळे रामपूर – निरमंड रस्ता बंद झाला आहे.

शीतलहर येण्याची शक्यता
इतकेच नव्हे तर पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पश्चिम आणि पूर्वेकडील भागात काही ठिकाणी शीतलहरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या दिल्लीत आज सकाळी आठ वाजता किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

बिहारमध्ये शीतलहरी सुरू, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडात पाऊस – हिमवर्षाव आणि गारपीठ
सध्या बिहार मध्ये शीतलहर सुरु असून तेथे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या नुसार येणाऱ्या ४८ तासांत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये जोरदार पाऊस-हिमवर्षाव आणि गारपीठ होण्याची शक्यता आहे. तर दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि उत्तर राजस्थानातील विविध भागात विजांच्या कडकडाटांसह काही ठिकाणी गारपीठ होऊ शकते. त्यामुळे पुन्हा कडाडून थंडी पडू शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/