भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिसामध्ये कोरोना विषाणूची दोन नवीन प्रकरणे उघडकीस आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 50 वर पोहोचली आहे, तर राज्यात कोविड -१९ चे १० रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, शुक्रवारी आणखी दोन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आणि दहा रूग्ण बरे झाले. ते म्हणाले की अद्याप 37 लोक संसर्गित आहेत.
राज्यात कोविड -१९ मुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. विभागाने म्हटले आहे की राज्यात कोविड -१९ ची आतापर्यंत ३,५४७ जणांची तपासणी करण्यात आली आहे, त्यापैकी ५० लोकांना संसर्ग झाला आहे. कोविड -१९ चे दहा रुग्ण बरे झाले आहेत, त्यांच्या अहवालात संसर्ग आढळलेला नाही, असे विभागाने शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यातील पाच जण भुवनेश्वर, दोन भद्रक आणि प्रत्येकी कटक, जाजपूर व पुरी येथील आहेत.
लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत
उल्लेखनीय आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्यात लॉकडाउन कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. असे करणारे ओडिशा हे देशातील पहिलेही राज्य आहे. तसेच राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये 17 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.