CBSE बोर्डाच्या निकालाबाबतची बातमी Fake, 11 जुलैला लागणार नाही निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या काही वेबसाईटवर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसल्याचं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे. काही वेबसाईटवर 18 जुलै 12 वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 10 वी इयत्तेचा निकाल 15 ते 17 जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा परिषदेने (CBSE) अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करत अद्याप बोर्डाकडून निकालाची कोणतीही तारीख जाहीर केली नसल्याचं सांगितलं आहे. सीबीएसईद्वारा निकालाची माहिती अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in यावर जाहीर करण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या वेबसाईटवर चेक करण्यास सांगितले आहे.
आज सीबीएसईच्या नावाने एक प्रेस रिलिज समोर आली होती. मात्र ही बातमी फेक असल्याचे बोर्डाच्यावतीने सांगितले जात आहे. अद्यापही सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासाठी तारीख ठरवण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.