TikTok वर व्हिडीओ बनवणं पडू शकतं महागात, ‘या’ App मुळं मोबाईल यूजर्सला ‘हा’ मोठा धोका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर भारतात टिकटॉक (TikTok) नावाच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनने धुमाकूळ घातला आहे. जवळपास ३० कोटी भारतीय लोकांनी हे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केलं आहे. याचे पूर्ण जगात १३० कोटीच्या आसपास युजर्स आहेत. २०१९ या वर्षात २० कोटी भारतीयांनी हे अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केले आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार स्वतःचा व्हिडीओ बनवण्यासाठी कामात येणाऱ्या या चिनी अ‍ॅप्लिकेशनपासून वापरकर्त्यांना धोका होऊ शकतो.

या रिपोर्टनुसार, टिकटॉक अ‍ॅप्लिकेशन मध्ये अशा काही त्रुटी आहेत ज्याने हॅकर्स त्यांच्या अकाउंटला नियंत्रित करू शकतात. तसेच व्हिडिओमधील सर्व डेटा देखील ते हाताळू शकतात.

अश्लीलता आणि हिंसाचारांना प्रोत्साहन
२०१५ मध्ये टिकटॉक हे अप्लिकेशन बाजारात आले होते आणि तेव्हापासून तो नेहमीच चर्चेत राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी मद्रास हायकोर्टाने यास ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते, कारण हे मुलांमध्ये अश्लील आणि लैंगिकतेस प्रोत्साहन देण्याचे काम करते.

१५ सेकंदांचा व्हिडीओ
टिकटॉक वर १५ सेकंदांचा व्हिडीओ अपलोड केला जातो, ज्यामध्ये वेगवेगळे मनोरंजन करणारे गाणे, आवाज आणि डायलॉग निवडून वापरकर्ते बॅकग्राऊंटला लावतात.

सायबर एक्सपर्ट अमित दुबे यांनी सांगितले की, रिपोर्ट्स मध्ये ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. पण त्यासाठी वापरकर्त्याला मोबाइल अ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे. अन्यथा, या अ‍ॅप्लिकेशन वरून हॅकर्स आपली वैयक्तिक माहिती जसे की ई-मेल, पत्ता आणि फोन नंबर यासारख्या गोष्टी काढू शकतात. त्यामुळे अ‍ॅप्लिकेशन अपडेट करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/