पहिल्या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम –अष्टविनायक मोशन फिल्म्स, प्रयोग कलाकृती आणि  एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांचा वतीने  पहिल्या फिल्म फ्रेम आंतरराष्टीय महोत्सवाचे आयोजन दि. २७ ते २९ डिसेम्बर २०१९ रोजी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड कॅम्पस मध्ये करण्यात येणार आहे.

या नवोदित (पहिल्याच )  आंतररराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवात जगभरातील जास्तीत जास्त देशांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे हा महोत्सव जागतिक विक्रम करणार आहे या संदर्भातील नोंदणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये होणार आहे.  फिल्मफ्रेम आंतररराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवा दिनांक २७ ते २९ डिसेम्बर २०१९ रोजी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कॅम्पस मधील सभागृहात होणार आहे …या मध्ये ६५ देशांनी सहभाग नोंदवलं आहे… ऐकून १५२ लघुपट व माहितीपट दाखवले जाणार आहेत. या महोत्सवाचा उदघाटन समारंभ दिनांक २७/१२/२०१९ रोजी सकाळी ११.०० वा. संपन्न होणार असून या उदघाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मा. मेघराज राजेभोसले ( अध्यक्ष, आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), मा. अमर देवकर  ( ” म्होरक्या” राष्टीय  पारितोषिक विजेते चित्रपट दिग्दशर्क ) मा. दयासागर वानखेडे (कॉपी “पारितोषिक विजेते चित्रपट दिग्दशर्क) मा.  डॉ. आर .एम . चिटणीस  (प्र कुलगुरू.एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी) मा. देवेंद्र जाधव (पारितोषिक विजेते चित्रपट दिग्दशर्क) हे उपस्तित राहणार आहेत .

अशी माहिती पत्रकार परिषदेत फिल्म फ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सव (लघुपट व माहितीपट) च्या आयोजकांनी दिली यावेळी फिल्म फ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे संचालक योगेश शर्मा, तसेच  एम.आई टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे स्कूल ऑफ मीडिया ऍण्ड फाईन  आर्टस् चे संचालक व महोत्सवाचे समन्वयक मकरंद माळवे, फिल्म फ्रेम आंतरराष्टीय  महोत्सवाचे समन्वयक आश्विन शर्मा. महोत्सवाचे प्रसिद्धीप्रमुख प्रशांत निकम उपस्तिथ होते

या महोत्सवामध्ये भारतातील तमिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ,गुजरात, जम्मू कशमीर, आसाम, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब,हरियाना, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यातील लघुपट व माहितीपट सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर जगभरातील नेदरलॅंड, बेल्जीयम, इराण, अमेरिका,ब्रटन, जर्मनी, फ्रान्स, अर्जेंटिना , पोलंड, स्पेन, पोर्तुगाल,क्युबा, इटली, आइसलँड, सिंगापूर, नॉर्वे, साऊथ कोरिया, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम, इस्त्रायल, केनिया, पेरू, चीन, जपान, रशिया, इजिप्त, ग्रीक, स्वित्झर्लंड, कोलंबिया, हंगेरी, बांग्लादेश, ऑस्ट्रिया आदी 65 पेक्षा जास्तदेशातील लघुपट व माहितीपट सहभागी झाले आहे.

या आंतरराष्ट्रीय महोत्सवात (लघुपट व माहितीपट) 350 लघुपट व माहितीपटांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 152 लघुपट व माहितीपट महोत्सवाच्या स्पर्धेच्या स्क्रीनिंगसाठी निवड करण्यातआली आहे.

या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये (लघुपट व माहितीपट) विविध फिल्ममेकरसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये लघुपटनिर्मिती, संहिता लेखन व लघुपट, माहितीपटांची तांत्रिक बाबीवरील मार्गदर्शनकरण्यात येणार आहे. यामध्ये दिग्दर्शक अमर देवकर, दिग्दर्शक दयासागर वानखेडे, दिग्दर्शक देवेंद्र जाधव, दिग्दशर्क योगेश शर्मा, मयूर जोशी ([प्रसिद्ध कॅमेरामन) व तसेच मान्यवर चित्रपट क्षेत्रांशी निगडित दिग्दशर्क, लेखक, निर्माते, कॅमेरामन, हे विद्याथ्यांना  फिल्ममेकर्सला मार्गदर्शन करणार आहे.

या फिल्मफ्रेम आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा (लघुपट व माहितीपट) समारोप व पारितोषिकवतरण समारंभ दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त सिनेप्रेमींनी, पुणेकर नागरिकांनी विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/