५० फुट खोल विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना जीवदान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर तालुक्यातील कळस येथील बाबा भरणे यांच्या ५० फुट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्यांना जीवदान मिळाले. पुणे येथील वन्यजीव बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने कोल्ह्यांना वाचविले.

भरणेवस्तीजवळ असलेल्या बिरोबा मंदिराजवळ भरणे यांच्या पन्नास फूट खोल विहिरीत दोन कोल्हे पडले होते. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना निदर्शनास आले असता त्यांनी याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात कळविले.

त्यांनी वनपरिक्षेत्र विभागाला माहिती दिली. वनविभागाचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी कात्रज येथील वन्यजीव पथकाला माहिती दिली. पथकाचे डॉ. सुमित्रा पाटील, केविन डिकॉस्टा, उमेश परदेशी, मयूर परदेशी, समीर परदेशी, ज्ञानेश्वर हिरवे, ज्ञानदेव ससाणे, दत्तात्रय पवार यांनी मदत केली. जाळीच्या साहाय्याने कोल्ह्यांना पकडून पिंजऱ्यात घालून बाहेर काढले. तपासणी करून वनात सोडून देण्यात आले. कोल्ह्यांचे भांडण होऊन त्यात ते विहिरीत पडले असावेत, असा अंदाज वन्य जीव पथकाने व्यक्त केला.

आरोग्य विषयक वृत्त  –

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

अमेरिकन डॉक्टरांनी केलं ‘ घड्याळाद्वारे ‘ हृदयरोगाचे निदान

महाराष्ट्राभोवती कॅन्सरचा विळखा घट्ट ; रुग्णांची संख्या वाढली

सावधान ! खाद्यपदार्थ ऑनलाईन ऑर्डर करताय.. !