केंद्र सरकार पुढच्या महिन्यात शाळा सुरू करण्याकरिता बनवतंय योजना, ‘हा’ आहे प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीला जवळपास सहा महिने झाले आहेत, परंतु अजूनही शाळा उघडण्याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. शाळा उघडण्याचा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर शाळा, पालक आणि मुले सर्वजण शोधत आहेत. परंतु, याच दरम्यान भारतात कोरोना व्हायरसची 20 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली असताना केंद्र सरकार शाळा उघडण्यावर विचार करत आहे.

केंद्राची शाळा उघडण्याची योजना
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार शाळा सप्टेंबरपासून उघडण्याची योजना तयार करत आहे. सरकार सप्टेंबर ते नाव्हेंबरदरम्यान, टप्प्याटप्प्याने शाळा उघडण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत प्रथम 10 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या जातील, त्यानंतर 6 वी ते 9 वीसाठी शाळा उघडण्याची योजना आहे. योजनेनुसार पहिल्या फेजमध्ये 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सांगितले जाईल. जर शाळेत चार सेक्शन असतील, तर एका दिवसात केवळ दोन सेक्शनमध्ये शिक्षण होईल, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता येईल.

अनेक शिफ्टमध्ये चालेल शाळा
याशिवाय शाळेची वेळ सुद्धा अर्धी केली जाईल. शाळेची वेळ 5-6 तासांवरून कमी करून 2-3 तास करण्यावर विचार सुरू आहे. वर्ग शिफ्टमध्ये केले जातील सोबतच शाळांना सॅनिटाईज करण्यासाठी एक तासाचा वेळ दिला जाईल.

याशिवाय शाळांना 33 टक्के स्टाफ आणि विद्यार्थ्यांसह चालवण्यात येईल. चर्चा अशीही आहे की, सरकार प्रायमरी आणि प्री-प्रायमरी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडणे योग्य समजत नाही. अशा स्थितीत ऑनलाइन वर्गच ठीक आहेत. याबाबत गाईडलाइन्स या महिन्याच्या शेवटी नोटिफाय केल्या जाऊ शकतात. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राज्यांवर सोडला जाऊ शकतो.

राज्याच्या शिक्षण सचिवांना पाठवण्यात आली पत्र
राज्याच्या शिक्षण सचिवांना याबाबत मागच्या आठवड्यात एक पत्र पाठवण्यात आले, यामध्ये पालकांकडून शाळा उघडण्याबाबत जाणून घेण्यास सांगितले होते आणि हे जाणून घेण्यास सांगितले होते की, पालक केव्हापर्यंत शाळा उघडण्यास तयार आहेत. याप्रकरणात राज्यांनी आपले स्टेटमेंट पाठवले आहे. यानुसार हरियाणा केरळ, बिहार, आसाम आणि लडाखने ऑगस्टमध्ये राजस्थान, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशने सप्टेंबरमध्ये शाळा उघडण्याबाबत म्हटले आहे.

पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत
मात्र, सर्वच पालक अजूनही आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याच्या स्थितीत नाहीत. काही दिवसांपूवी शाळा उघडण्याबाबत चर्चा सुरू असताना पालकांनी यास विरोध केला होता. पालकांना भिती वाटते की, त्यांच्या मुलांच्या जिविताला कोरोना व्हायरसमुळे धोका निर्माण होऊ शकतो.

काय आहे जगाची स्थिती
सरकारचे म्हणणे आहे की, स्विझर्लंड सारख्या देशाने शाळा उघडल्या आहेत. परंतु, हे लक्षात घेतले पाहिजे की, इस्त्रायलसारख्या देशाला शाळा उघडल्यानंतर पुन्हा महिनाभरात बंद कराव्या लागल्या. कारण कोरोना व्हायरसची प्रकरणे खुप वेगाने वाढल्याचे दिसून आले.