ज्येष्ठ पत्रकाराने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली ‘ही’ इच्छा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी काल (रविवारी) सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली. त्यामुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. लटपटे हे पुंडलिकनगर परिसरात रहावयास होते.
त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी ”मेहुणे संजीव उन्हाळेने आत्महत्या करण्यास भाग पाडले म्हणून आत्महत्या करीत आहे.

संजीव उन्हाळेच गुन्हेगार, जातीवादी, भ्रष्ट आहे. त्याने माझ्या पत्नीचे मन परिवर्तन करुन आमचा ३० वर्षाचा संसार मोडला. त्यास शिक्षा मिळाली पाहिजे.  तसेच त्यांनी चिठ्ठीतून आपली शेवटची इच्छा व्यक्त करताना म्हटले आहे, माझे PM (शवविच्छेदन) करण्याची गरज नाही.तसेच मला मत्राग्नी (धार्मीक विधी करु नयेत) देऊ नये. अशी माझी शेवटची इच्छा आहे. तरीही माझी बहिण गजाबाई गर्जे हिचा अंतिम निर्णय राहील. माझ्या पत्नीला कळवावे आणि अंत्यदर्शनाला ती आली तर मला बरे वाटेल.”

औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांच्या बहिणीबरोबर त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून त्यांचे आणि संजीव उन्हाळे यांचे टोकाचे मतभेद होते. यातून त्यांनी अनेक वेळा फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. पत्रकार ते एकलव्य प्रकाशन आणि पुन्हा पत्रकार हा त्यांचा प्रवास संघर्षमय राहिला.  गेल्या काही महिन्यापासून ते आर्थिक विंवचनेत होते. त्यात गेल्या काही महिन्यापासून पत्नी माहेरी गेल्याने ते अधिकच खचले होते. एक अतिशय हुशार, जिगरबाज पत्रकार, संपादक म्हणून त्यांची ओळख होती.