#Loksabha : गिरीश बापट यांच्या पुण्यातील उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप व शिवसेना युतीच्या प्रचाराचा समन्वय साधण्यासाठी समन्वयकाची घोषणा करण्यात आली आहे. त्यातूनच पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुण्यातील उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. तर, जालना मधून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना शांत करण्यासाठी त्यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

हेही वाचा – युतीच्या ‘त्या’ नव्या धोरणामुळे काही जणांच्या उमेदवारीला कात्री ?  

दोन्ही पक्षातील उमेदवार आणि प्रमुख नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी युतीने प्रादेशिक पातळीवर समन्वयकांची नेमणूक केली आहे. या समन्वयकांना संपूर्ण विभागात फिरावे लागते. त्यासाठी त्यांना उमेदवारी दिली तर ते इतर ठिकाणी लक्ष देऊन शकणार नाही, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जात नाही. गिरीश बापट यांची पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, शिरुर, सोलापूर, माढा आणि मावळ (रायगडमधील तीन विधानसभा वगळून) समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुण्यातून त्यांच्या उमेदवारीचा दावा आपोआपच रद्द होईल अशी चर्चा आहे. त्यामुळे आता विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि शहराध्यक्ष गोगावले यांच्यात आता तिकीट मिळविण्यात चुरस राहणार आहे. मात्र, अद्यापही गिरीश बापट यांना उमेदवारी नाकारण्यात आली असे म्हणता येणार नाही. गिरीश बापट यांच्या पुण्यातील उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा आहे.

दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आव्हान देणारे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचे समाधान करण्यासाठी त्यांच्याकडे मराठवाड्याच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

You might also like