‛कोरोना’ पीडितांसाठी दौंड राष्ट्रवादीकडून 145 बाटल्या रक्त संकलन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसचा मुकाबला करताना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 145 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले असून हे दान करण्यात आलेले रक्त कोरोना रुग्णांसाठी पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आव्हानला प्रतिसाद देत दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवारी हा उपक्रम राबविण्यात आला. हे शिबिर दौंड शहरातील नवीन कोर्टच्याजवळ असणाऱ्या लिंगाळी, समर्थ नगर , पासलकर वसाहत येथे घेण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिन गायकवाड, विक्रम साबळे, अल्ताफ मुलानी यांनी केले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like