पिंपरी : ‘स्थायी’च्या माजी अध्यक्षास मारहाण प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी मडिगेरी यांनी तक्रार दिली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर महापौर दालनासमोर स्थायी समिती अध्यक्षांचा कक्ष आहे. त्याला लागूनच स्थायी समिती अध्यक्षांचा अँन्टी चेंबर आहे. तिथे सोमवारी सांयकाळी सव्वा सहा वाजता हा प्रकार घडला.

‘तुम्ही अध्यक्ष असताना भरपूर पैसे कमवले आहेत, त्यामुळे त्यातील काही वाटा आम्हाला द्यावा’, असे म्हणत कलाटे बंधूंनी वाद घातला. त्यानंतर आरडाओरड करुन मारहाण केली. आवाज एकून काही महापौर, इतर पदाधिकारी व नगरसेवक यांनी मध्यस्थी करुन मला सोडवले असे मडीगेरी यांनी तक्रारीत म्हटले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like