पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड यथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धांडेनगर येथे घडली आहे. धांडेनगर येथील एका लिंबाच्या झाडाखाली सरकारी रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दिलीप प्रकाश केंद्रे (वय-30) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दिलीप केंद्रे हे जळगाव जिल्ह्यातून बीडमध्ये बदलून आले होते. ते मुळचे अंबेजोगाईचे असून त्यांनी पोलीस ठाण्यच्या हद्दीतील धांडे नगर येथील एका लिंबाच्या झाडाखील स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक, उप अधीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

दिलीप केंद्रे यांनी आत्महत्ये पूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोलिसांनी केंद्रे यांच्या खिशातून सुसाईड नोट जप्त केली आहे. दिलीप केंद्रे यांच्या पत्नीने जळगाव मधील एका तरुणीवर आरोप केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत आणि पोलीस निरीक्षक पूरभे दिलीप केंद्रे यांच्या पत्नीचा जबाब घेतला. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/