घृणास्पद ! लिंगपिसाट दिराचा २० वर्षीय वहिनीवर लैंगिक अत्याचार ; दीर-भावजय नात्याला काळीमा फासणारी घटना

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – रात्री पती कामाला गेल्यानंतर घरी कोणी नसल्याचा गैर फायदा घेत लिंगपिसाट बनलेल्या चुलत दिराने आपल्या २० वर्षीय वहिनीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील एका गावातील परिसरात घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी या लिंगपिसाट दिरावर गुन्हा दाखल केला आहे.

दौंड तालुक्यातील एका गावामध्ये तक्रारदार महिला आपल्या पती, सासू आणि मुलांसह राहते. दि. ३० जून रोजी पीडित महिलेचा पती आणि घरातील मंडळी बाहेर गेली असताना ही महिला आपल्या लहान मुलीसह जेवण करून झोपली होती. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास पीडित महिला लघुशंकेसाठी घराबाहेर गेली होती. ती पुन्हा घरामध्ये येऊन दरवाजा लावत असताना तिचा चुलत दिर दरवाज्याच्या आड दडल्याचे तिच्या लक्षात आले तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताचं नराधम दिराने तिला घरात ढकलून आतून दरवाजाची कडी लावून पीडितेवर जबरदस्तीने पाशवी बलात्कार केला. यावेळी महिला प्रतिकार करत असताना नराधम दिर तिच्या छातीवर नखांच्या साहाय्याने ओरखडून शाररिक त्रास देत तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता.

दुसऱ्या दिवशी पती आणि सासू घरी परतल्यानंतर तिने रात्री झालेला प्रकार सांगितला. यावेळी घरातील मंडळींनी तिला धीर देऊन अखेर लिंगपिसाट दिरावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस मोहीते हे करीत असून आरोपी फरार आहे.

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

You might also like