लासलगाव बाजारात लाल कांदा 8001 रूपये

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – उन्हाळ कांद्याच्या बरोबर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यानेही दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत मजल मारली होती. मात्र लासलगाव बाजार आवारता लाल कांद्याची आवक वाढल्याने बुधवारी मंगळवारच्या तुलनेत 300 रूपये कमाल भावात  सरासरी दरात घसरण झाली. त्यानंतर आज कांद्याचे भाव  पुन्हा थोडेसे वर गेल्याचे दिसले.

लासलगांव बाजार समितीत गुरूवारी  8210 क्विंटल लाल कांद्याची किमान 2401 ते कमाल 8001 व सरासरी 6601 रूपये भावाने विक्री झाली. बुधवारी मंगळवारच्या तुलनेत 300 रूपये कमाल भावात घसरण झाली  असून  7324 क्विंटल लाल कांदा किमान 2101 ते कमाल 7500 व सरासरी 6201 रूपये भावाने विक्री झाला होता.

कांद्याला जादा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून झालेली मोठी आवक, जादा दरामुळे ग्राहकांनी थोडी पाठ फिरविल्याने तसेच कांदा आयात केल्याने  कांद्याचे दर गेल्या चार ते पाच दिवसांत निम्म्यावर येऊन ठेपले आहेत.  त्यामुळे ग्राहकांना सध्या दिलासा मिळू लागला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/