‘पुरुषांची महिलांकडे बघण्याची नजर बदलायला हवी’, शुभांगी चौधरी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वर्ध्यातील हिंगणघाट मधील घडलेली घटना ही अतिशय क्रूर आहे. भारतात आजही महिला असुरक्षित आहेत असं दिसत आहेत, एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रकार हा अतिशय मन हेलावून टाकणारा आहे. एकीकडे माहिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतानाच, दुसरीकडे पेट्रोल ओतून जाळणे, अ‍ॅसिड हल्ला करणे, बलात्कार करणे, आशा एक ना अनेक प्रकार आपल्या देशात घडताना दिसत आहेत. असं असूनही आरोपींवर कठोर कारवाई होतना दिसत नाही. स्वातंत्र्यापासून महाराष्ट्रात अशा घटना घडतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

भारतात छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे महिला घराबाहेर पडली तर परत घरी येते का नाही या घटनेवरून मात्र मनामध्ये एक ना अनेक प्रश्न निर्माण होतात. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना पकडण्यात पोलिसांना यश येतं पण यावर लवकरात-लवकर कठोर कारवाई करवी अशी महिलांची इच्छा असते.

साधी गोष्ट आहे देशातील महिलांकडे बघताना आपली नजर चांगली ठेवली तर आपला देश सगळ्याच अडचणीतून मुक्त होईल. महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना कठोरात-कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदाही आणखी कडक व्हावा.