News Rules | वाहनांच्या ‘पाँ-पाँ’, ‘चाँ-चाँ’पासून मिळेल मुक्ती ! हॉर्न वाजवल्यास ऐकू येईल ‘बासुरी’ अन् ‘व्हायलियन’ची धुन; सरकार लागु करतंय नवीन नियम

नवी दिल्ली : News Rules | सकाळी जेव्हा आपण घरातून ऑफिससाठी निघतो तेव्हा रस्त्यावर वाहनांच्या हॉर्नने अस्वस्थ होतो. रस्त्यावर पुढे वाहनांची रांगच रांग आणि मागून येणार्‍या वाहनांचा पाँ-पाँ सारखा कर्णकर्कश हॉर्नचा आवाज, यामुळे डोकं गरगरतं. वाहनांचे आवाज इतके इरिटेड करतात की, अनेकदा तर ट्रॅफिक सिग्नलवर याच्यावरून (News Rules) भांडणे होतात.

बहुतांश वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रतिबंधित क्षेत्रात सुद्धा हॉर्न वाजवतात. असे केल्याने ध्वनी प्रदूषण होते. कानांना त्रास देणारा हा आवाज असह्य असतो.

मात्र केंद्र सरकार गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाबाबत एक नवीन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हॉर्नचा इरिटेटिंग आवाज सुखद बनवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत.

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

काय आहे मंत्रालयाची तयारी?

स्वता नितिन गडकरी यांनी नवीन नियमांबाबत मंत्रालयाच्या तयारीची माहिती शेयर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानुसार, लवकरच गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजापासून मुक्ती मिळणार आहे. गडकरी यांनी म्हटले आहे की, त्यांच्या मंत्रालयाचे अधिकारी हॉर्नचे आवाज बदलण्यावर काम करत आहेत.

बदलणार हॉर्नचा आवाज!

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यानुसार, येत्या काळात वाहनांच्या इरिटेटिंग आवाजाऐवजी बासरी, व्हायलीनसारख्या भारतीय संगीत वाद्यांचा (Indian musical instruments) मधुर ध्वनी ऐकू येईल.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितला आपला अनुभव

नितीन गडकरी म्हणाले, ते नागपुरमध्ये 11व्या मजल्यावर राहतात. रोज सकाळी 1 तास प्राणायाम करतात
आणि या दरम्यान रस्त्यावर वाजवल्या जाणार्‍या वाहनांच्या हॉर्नने सकाळचे शांत वातावरण ढवळून निघते. हा
त्रास सहन करत असतानाच एक कल्पना सुचली की, वाहनांचे हॉर्न योग्य पद्धतीचे असावेत. त्यांनी म्हटले की,
वाहनांच्या हॉर्नचा आवाज भारतीय वाद्यांसारखा असावा, आणि यावर आम्ही आता काम करत आहोत.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी म्हटले, हॉर्नबाबत नियमांपैकी काही नियम वाहन उत्पादकांवर सुद्धा लागू होतील.
असे यासाठी की जेव्हा वाहनाची निर्मिती केली जाते, त्यावेळी त्यांच्याकडे योग्य प्रकारचे हॉर्न असावेत. नवीन
नियमानंतर वाहनांच्या कर्कश हॉर्नऐवजी तबला, ताल, व्हायलीन, बिगुल, बासरी इत्यादी धुन ऐकू येऊ शकते.

हे देखील वाचा

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

Earn Money | यंदा गुंतवणुकदारांची कमाई झाली 66 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त, आकड्यांवरून जाणून घ्या प्रगतीची आलेख; तुम्ही देखील घेऊ शकता लाभ

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : News Rules | nitin gadkari is working on new rules to make car horns sound like musical instruments such as flute violin get rid to horns irritating sounds

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update