पिंपरीतील संजय गांधीनगरमध्ये टोळक्याची दहशत ; अनेक वाहनांची तोडफोड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी येथील संजय गांधी नगरमध्येही टोळक्याने दहशत माजवली आहे. रस्त्यावर उभा असणाऱ्या १८ वाहनांची तोडफोड करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. हातामध्ये लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्र घेऊन आलेल्या समाजकंटकांनी वाहनांचं नुकसान केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय गांधी नगर येथे अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. हातात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रे घेऊन दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ही तोडफोड करण्यात आल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेत दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकीसह इतर वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिस, गुन्हे शाखा पोलीस तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शहरात वाहनांची तोडफोड ही लागलेली कीड आहे. वारंवार शहरात तोडफोडीच्या घटना घडत आहेत. तर पिंपरी परिसरात घडलेल्या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –