मुलगा डाॅ. सुजय विखेंच्या यशासाठी आई शालिनीताई ‘पायी’ साई दरबारी

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आपल्यालाच यश मिळावे यासाठी उमेदवारांनी आता देवाला साकडे घातले आहे. राज्यातील सर्वात चर्चेच्या ठरलेल्या नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉं सुजय विखे यांच्या यशासाठी त्यांच्या मातोश्री व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील भल्या पहाटे लोणी वरून शिर्डीला पायी निघाल्या आहेत. पहाटे तीन-साडेतीन वाजता निघालेल्या शालिनीताई विखे सकाळी आठ वाजता साई दरबारी पोहचल्या आहेत.

याशिवाय पहाटे साडेचार वाजता होणाऱ्या काकड आरतीला शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मतमोजणी केंद्रात जाण्यापूर्वी शिर्डीला साई दरबारी हजेरी लावली आहे. गोडसे यांनी उपस्थित राहून साईंना यशासाठी प्रार्थना केली. यावेळी मंदिर प्रमुख रमेश राव चौधरी भाजपाचे सचिन तांबे व शिवसेनेचे सचिन कोते उपस्थित होते.