जनतेला चेहरा न दाखवू शकणारे लोक Facebook वर आरोप करतायेत : प्रकाश जावडेकर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींच्या “फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि आरएसएसने नियंत्रण ठेवले आहे” या विधनावर आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “जे लोकांसमोर तोंड दाखविण्यास असमर्थ आहेत त्यांनी फेसबुकवर आरोप केले आहे. २०१९ मध्ये जेव्हा लोकांनी कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यास नकार दिला तेव्हा पक्षाने ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. आता कॉंग्रेसकडे काहीच उरले नाही म्हणूनच ते निराधार आरोप करीत आहेत. न्यूज 18 इंडियाच्या चौपाल कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारच्या रिपोर्ट कार्ड सेशनमध्ये भाग घेतला होता, त्यावेळी ते बोलत होते.

फक्त ट्वीट करून पार्टी चालत नाही

प्रकाश जावडेकर म्हणाले की, आम्ही कधी माध्यमांवर नियंत्रण ठेवले नाही, कॉंग्रेस हताश झाली आहे, म्हणून आरोप-प्रत्यारोप केले जातात. ते म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही माध्यमांना कोणताही आदेश दिला नाही, कारण ती आमची कार्यशैली नाही. आम्ही लोकांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर काम करत आहोत. कॉंग्रेस ट्वीट-रिट्विटद्वारे काम करत आहे, परंतु हे लोक विसरले आहेत की यामुळे पक्षाचे कार्य होत नाही. ते म्हणाले, ‘आमच्या नेत्यांची दृष्टी स्पष्ट आहे की जे काही करावे लागेल ते देशासाठी करावे लागेल.’

कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल

जागतिक महामारी कोरोना विषाणू विषयी बोलताना प्रकाश जावडेकर चौपाळ कार्यक्रमात म्हणाले की, कोरोनाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे, त्याचा आपल्या देशावरही परिणाम झाला आहे. लवकरच कोरोना लस उपलब्ध होईल. आपल्या देशातील शास्त्रज्ञ लसीवर काम करत आहेत आणि लवकरच त्याचा सकारात्मक परिणाम प्रकट होईल. तसेच ते म्हणाले की कोरोना संपल्यानंतर आमचा विकास रथ वेगवान होईल.