‘या’साठी ‘त्यानं’ रचली जैश-ए-मोहम्मदच्या हल्ल्याची कथा 

गोवा : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर भारतभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मात्र या गोष्टीचा फायदा काहीजण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेत आहेत असे दिसून आले आहे. एका बेरोजगार युवकाने नोकरी मिळावी या अपेक्षेने गोवा येथे जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना हल्ला करणार आहे अशी खोटी कथा रचली आणि पोलिसांना सांगितली. विनय पालवेकर (३१) असं या तरुणाचं नाव असून तो सावंतवाडीचा रहिवासी आहे. पण त्याच्या कथेमध्ये कोणतेही तथ्य न आढळल्यामुळे पोलिसांनी सीआरपीसी १५१ अंतर्गत लोकांची दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
अशी रचली कथा –
जैश-ए-मोहम्मदबद्दल भारतावर अजून एक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती. यातून हल्ल्याची कहाणी रचण्याची कल्पना त्याला सुचली. या कहाणीमुळे आपल्याला प्रसिद्धी मिळून नोकरी मिळेल अशा आशेने त्याने कथा रचून त्याला त्या अनुषंगाने पुरावेही सादर केले. पालवेकर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो रस्त्यावरून फिरत असताना त्याला एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याच्याकडे सहा बॅग्स होत्या. या सहाही बॅगा त्याने कुंपणात लपवल्या. त्यानंतर एक गाडी आली आणि त्याला घेऊन गेली. त्यानंतर पालवेकरने त्यातील एक बॅग उघडली. त्यात त्याला काही कागदपत्रं सापडली. या कागदपत्रांवर गोव्याचे नकाशे होते. या सगळ्या नकाशांवर जैशचे चिन्ह आणि नाव लिहिलेले होते. तसेच गोव्यातील वर्दळीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची सूचना दिली होती. गोवा येथील गजबजलेल्या जागांची पाहणी करा. तिथे बॉम्बहल्ला करा अशा आशयाची पत्रंही होती. गोव्यामध्ये फिरताना सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करा असंही त्या पत्रांमध्ये लिहिण्यात आलं होतं. पुलवामा नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सची उर्दुतील प्रतही या कागदपत्रांमध्ये होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन चौकशी केली मात्र त्यात पालवेकरचा बनाव उघडकीस आला. त्यानंतर त्याची कसून ५ तास चौकशी करण्यात आली. त्यात त्याने हा सारा बनाव नोकरी मिळवण्यासाठी केला होता अशी कबुली दिली. त्यामुळे दिशाभूल करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली.

महत्वाच्या बातम्या –

भारताची दोन विमानं पाडली, एक वैमानिक ताब्यात, पाकचा दावा

काल घुसून मारलं अन् आज तोंड फोडलं ; Airstrike भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं 

पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत शिरली ; बाॅम्ब टाकल्याची शक्यता ? 

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या 

भारताची 2 विमानं पाडली, 1 वैमानिक ताब्यात, पाकचा दावा