Weather Alert : कोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी 2 दिवस हाय अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (meteorological department) कोकण विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस कोकणात ढगफुटी होण्याचा अंदाज हवामान खात्याने (meteorological department) वर्तवला आहे. तर रत्नागिरी  जिल्ह्यात पुढील दोन दिवस हाय अलर्ट जारी केला आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाचे आगमन

रायगड जिल्ह्यातही दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झालं.

अशात 10 आणि 11 जून रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

एवढंच नाही तर ताशी 12 ते 20 किमी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे दिवस हे रायगडकरांसाठी धोकादायक असणार आहेत. यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका.

आणि अतिमहत्त्वाच्या कामासाठी हवामानाचा अंदाज घेतच बाहेर पडा, अशी सूचना देण्यात आली आहे.

शहरामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नदी, नाले, विहीर, तलावाच्या ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नका. विजेच्या खांबाजवळही थांबू नका, असे आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अतिवृष्टी

पुढच्या चार दिवसांमध्ये मुंबईसह राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर पावसाला सुरु झाली असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर देखील ढगाळ वातावरण आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये काळोख दाटून आल्याचे पहायला मिळत आहे.

Also Read This : 

 

संजय राउतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले – ‘विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं’

 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत

 

Pune Crime News | मोक्का कारवाई नंतर गायब झालेला सराईत गुन्हेगार सुलतान उर्फ टिप्या पोलिसांच्या जाळयात, उस्मानाबाद जिल्हयातून अटक

 

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

 

Devendra Fadnavis | ‘विषय राज्याच्या हाती, पाठपुरावा मात्र केंद्राकडे’

 

 जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हालहैराण