टीम इंडियाचा कोच साठीतला नको !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार असल्याचे माहिती मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी असल्याचे मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यानंतर बीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफमधील देखील काही जणांची सुट्टी होणार असल्याने या पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत. यासाठी बीसीसीआयने काही अटी घातल्या असून यामध्ये वयासह तुमच्या अनुभवाचा देखील विचार केला जाणार आहे.

पुढीलप्रमाणे आहेत अटी –

१) प्रशिक्षपदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय ६० च्या आत असावे.
२) त्याला दोन वर्ष आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकपदाचा अनुभव असावा.
३) या उमेदवाराला ३० कसोटी किंवा ५० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याचा अनुभव असावा.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक पदासह, गोलंदाजी प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, फिल्डिंग प्रशिक्षक त्याचबरोबर फिजिओथेरपिस्ट आणि व्यवस्थापक अशा विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या सर्व पदांसाठी ३० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. वर्ल्डकप नंतर रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचा कालावधी संपणार होता. मात्र बीसीसीआयने त्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता बीसीसीआय नवीन नेमणूक करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता या पदासाठी कोण कोण अर्ज करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like